
एक वेगळीच घटना सध्या पुण्यात समोर आली असून एका विवाहविषयक संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर लग्नाचा बहाणा करून एका तरुणीला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला त्यानंतर तिचा ईमेल एड्रेस घेऊन त्यावर सुमारे 14 लाख रुपयांचे कर्ज आरोपीने घेतले. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित तरुणी ही लोहगाव येथील रहिवासी असून शंतनु गंगाधर महाजन ( वय 28 राहणार खराडी ) असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार आरोपीने आपल्याला अनेकदा विमाननगर येथील लेमन ट्री हॉटेल, हिंदुस्तान हॉटेल यासह इतरही अनेक ठिकाणी घेऊन जात वेळोवेळी हॉटेलवर आपले लैंगिक शोषण केले असे म्हटले आहे.
फिर्यादी तरुणीने एका संकेतस्थळावर लग्न जुळवण्यासाठी विवाहाची नोंदणी केलेली होती त्यावेळी तिची शंतनु महाजन या व्यक्तीसोबत ओळख झाली. त्याने तिला लग्नाची मागणी करत अनेकदा हॉटेलवर भेटायला बोलावले याच दरम्यान त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि तिची नजर चुकवून तिच्या मोबाईलवर ईमेल एड्रेस घेऊन त्याच्या आधारे तिच्या नावावर 14 लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि ही रक्कम स्वतःच्या अकाउंटला जमा करून घेतली. सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे अधिक तपास करत आहेत.