पुण्यात अल्पवयीन मुलांनी केले ‘ मोठे कांड ‘ , पीडितेच्या आईची पोलिसात धाव

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना पुणे जवळ पिंपरी इथे उघडकीस आली असून एका 22 वर्षीय तरुणानं पोलीस असल्याची बतावणी करत अल्पवयीन मित्रांच्या मदतीने पीडित मुलीच्या बहिणीला उचलून घेऊन जाण्याची धमकी देत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडीओ पाठवण्यास भाग पाडले आणि त्यानंतर त्यांनी हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील केले आहेत.

पीडित मुलीच्या आईनं देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून ज्ञानेश्वर शिवाजी जाधव असं गुन्हा दाखल झालेल्या 22 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याच्या भोंडाले येथील रहिवासी असून पोलिसांनी अन्य दोन अल्पवयीन मुलांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ज्ञानेश्वर यानं देखील पीडित मुलीला फोन करून अश्लील चॅटिंग सुरु केले आणि आपण पोलीस असल्याची बतावणी करत पीडित मुलीला नग्न व्हिडीओ पाठवण्यास सांगितलं आणि त्याने आणि त्याच्या मित्रानी हा व्हिडीओ व्हायरल देखील केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलानं आधी 13 वर्षीय पीडित मुलीला ‘तुझ्या बहिणीला उचलून नेईन’ अशी धमकी दिली होती. तसेच तिला बळजबरीनं नग्न व्हिडीओ बनवायला लावला होता. यानंतर आरोपी अल्पवयीन मुलानं संबंधित व्हिडीओ दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाठवण्यास सांगितला यानंतर दोन्ही अल्पवयीन आरोपींनी संबंधित प्रकार आरोपी ज्ञानेश्वर याला सांगितला आणि तो व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. सदर प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील करत आहेत.


Spread the love