पुण्यात खळबळ ..’ अन्यथा मृत्यू अटळ ‘, महिलेच्या भीतीला घाबरून समोरील व्यक्तीने..

Spread the love

महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना पुणे येथे उघडकीस आली असून पिंपरी-चिंचवड परिसरात तुमच्या परिवारावर कोणीतरी करणी केली आहे त्यामुळे गुप्त आणि अघोरी पद्धतीचे पूजा करावी लागेल अन्यथा घरात मृत्यू अटळ आहे अशी भीती दाखवून एक जणाकडून सात लाख 21 हजार रुपये फसवल्याप्रकरणी एका ज्योतिष महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्योग नगर चिंचवड येथे हा प्रकार उघडकीस आलेला आहे.

किमदेवांशी सोलंकी ( राहणार उद्योग नगर चिंचवड ) असे गुन्हा दाखल करणाऱ्या करण्यात आलेल्या ज्योतिष महिलेचे नाव असून याप्रकरणी 52 वर्षीय व्यक्तींने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांना होणारा मानसिक त्रास कमी होण्यासाठी आरोपी ज्योतिष महिलेने त्यांना अघोरी पूजा करण्याचे सांगितले.

तुमच्यावर मुसलमान, पीर, फकीर किंवा बाबा, तृतीयपंथी यांच्यापैकी एकाने करणी केली आहे त्यामुळे फिर्यादी यांना दिलासा मिळावा म्हणून गुप्त पद्धतीची आणि अघोरी पूजा करावी लागेल अन्यथा घरात मृत्यू होईल, अशी भीती या महिलेने फिर्यादी यांना दाखवली होती. वेळोवेळी फिर्यादी यांनी अशाच पद्धतीने आरोपी यांना सात लाख 21 हजार रुपये दिले आहेत. ‘

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून भादवि कलम 420, 387 तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचे अधिनियम 2013 च्या कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत वारे हे करत आहेत .


Spread the love