पुण्यात खळबळ..चायनीजच्या गाडीवर नूडल्स विकणारा चक्क आंतरराष्ट्रीय रॅकेटचा ?

Spread the love

एखाद्या व्यक्तीची वेशभूषा यावरून त्याच्या कार्यपद्धतीचा अंदाज बांधला जातो मात्र अनेकदा हा अंदाज खोटा देखील ठरतो आणि साध्या वेशभूषेमध्ये लपलेला एखादा व्यक्ती मोठा गुन्हेगार असू शकतो, अशीच एक घटना पुणे शहरात उघडकीस आलेली आहे.

पुणे शहरामध्ये एक छोटेसे हॉटेल चालवणारा व्यक्ती ज्याचा वेष अत्यंत गबाळा आहे आणि कधीही तो चांगले कपडे घालत नाही आणि गबाळा राहतो त्यामुळे तो एक साधारण हॉटेलवाला असावा असा अंदाज होता मात्र सदर व्यक्ती हा आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा दलाल असल्याची माहिती गुप्त सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवायला सुरू केली. माहिती खरी असल्याचे आढळल्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.

राहुल संन्यासी ( वय ३० राहणार लोहगाव ) आरोपीचे नाव असून त्याच्यासोबत नेपाळ दिल्ली उज्बेकिस्तान आणि मुंबई येथील चार महिलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. राहुल संन्यासी हा मूळचा आसामचा असून गेल्या काही वर्षांपासून तो पुणे येथे राहतो. आपल्यावर कुणाचा संशय येऊ नये म्हणून तो चायनीजची गाडी चालवत होता त्यामुळे तो इतका मोठा आंतरराष्ट्रीय दलाल असू शकतो यावर सुरुवातीला पोलिसांचाही विश्वास बसत नव्हता.

गुप्त सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांना ही माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवायला सुरू केली. त्याचा मुख्य व्यवसाय हा वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवणे हा असल्याचे आढळून येताच पोलिसांनी छापा टाकून त्याला पकडले आणि त्याच्याकडून दोन मोबाइल, पाच हजार रुपये आणि इतर साहित्य जप्त केले.

राहुल हा फक्त व्हाट्सअप मेसेज आणि कॉलवरच बोलत असायचा तसेच कोणी ग्राहक जर त्याच्याकडे आले तर त्यांच्याकडून हजार दोन हजार रुपये घेऊन रूम बुक करायचा आणि रूम बुक झाल्यावर सदर तरुणीला रिक्षात किंवा अर्जंट असेल तर टू व्हीलरवरही तिथे नेऊन पोहोचवायचा. तरुणींकडून आलेल्या पैशात निम्मे पैसे तो स्वतःसाठी ठेवत होता अशीही माहिती तपासात पुढे आली आहे.


Spread the love