पुण्यात खळबळ..झोमॅटोबॉयला म्हणाले ‘ चिखलीचा रस्ता सांग आणि त्यानंतर.. ‘

Spread the love

नोकरी नसल्यामुळे अनेक तरुण झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात आणि डिलीव्हरीसाठी अहोरात्र कार्यरत असतात. ग्राहकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी रात्री-अपरात्री कधीही त्यांना जावे लागते मात्र आता ते देखील चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याची एक घटना पुणे येथे उघडकीला आलेले असून पहाटे डिलिव्हरी घेऊन घरी जाणाऱ्या जाणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयवर चार जणांनी हल्ला करून त्याला लुटले आहे बालेवाडी येथील निकमार कॉलेज येथे ही घटना मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता घडलेली आहे.

सदर प्रकरणी सौरभ उत्तम गंगाने ( वय 21 राहणार शास्त्रीनगर काळेवाडी ) याने फिर्याद दिलेली असून सौरभ झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो . मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास तो डिलिव्हरी घेऊन जात असताना दोन मोटार सायकलवरून चार जण आले आणि त्यांनी कॉलेजच्या गेटजवळ त्याला थांबवत चिखलीला जायचा रस्ता सांग असे म्हणत अडवले आणि त्यापैकी एकाने कोयत्याने त्याच्या हातावर वार केले.

त्याने डावा हात पुढे केला असतात तो वार सौरभ याच्या डाव्या हाताच्या मनगटावर बसला आणि ते खाली पडले त्याचवेळी दुसऱ्या चोरट्याने त्यांच्या खिशातील पाकीट जबरदस्तीने काढून घेतले. सतराशे रुपये, आधार कार्ड, पॅन कार्ड दोन बँकांचे एटीएम मोबाईल आणि सेट तसेच मोबाईल चार्जर ब्लूटूथ असे सर्वकाही हिसकावून ते राधा चौकाच्या दिशेने पळून गेले. सौरभ यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत


Spread the love