पुण्यात खळबळ..फेसबुकच्या मैत्रीचा ‘ वेगवेगळ्या ‘ लॉजवर शेवट , महिला म्हणतेय की..

Spread the love

पुणे येथे एक खळबळजनक घटना समोर आली असून फेसबुकवर ओळख झाल्यानंतर एका घटस्फोटित महिलेशी मैत्री प्रस्थापित करून तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सदर प्रकार जानेवारी 2018 ते 19 जुलै 2022 यादरम्यान सांगवी, विमाननगर, बाळेवाडी या परीसरात वेगवेगळ्या लॉजवर घडलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अजय रमेश बोतालजी ( वय 47 राहणार बिबेवाडी पुणे ) असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात 37 वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिलेली आहे. सांगवी पोलिस ठाण्यात दाखल होत महिलेने फिर्याद नोंदवली असून त्यामध्ये आपला घटस्फोट झालेला असल्याने फेसबुकवर हा आरोपी आपल्या संपर्कात आला होता त्यानंतर त्याने मैत्रीचे आमिष दाखवत वेळोवेळी आपल्यावर ठिकाणी घेऊन जात अत्याचार केले असे तिचे म्हणणे आहे .


Spread the love