पुण्यात खळबळ.. बसमध्ये हात धरून म्हणाला ‘ येतेस का लॉजवर ? ‘

Spread the love

पुणे शहरात एक खळबळजनक प्रकार समोर आलेला असून एका तरुणीचा पाठलाग करून बसमध्ये सर्वांसमोर तिचा हात धरून आपल्या सोबत चल असे म्हणणाऱ्या एका व्यक्तीला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार सर्व नागरिकांच्या समोर घडत होता मात्र तरीही कोणी त्याला हटकले नाही अखेर बसवाहकाने त्याला खाली उतरून दिले आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

उपलब्ध माहितीनुसार, विकी भास्कर लोंढे ( वय 27 राहणार गुडविल सोसायटी धानोरी ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून चंदननगर येथील टाटा गार्डरूम जवळ असलेल्या बस स्टॉपवर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. सदर प्रकरणी चंदननगर परिसरात राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीने त्याच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे.

फिर्यादी तरुणीही गाडीतळ बस स्टॉपवर बसची वाट पाहत होती तिथे आला आणि त्याने माझ्या गाडीवर बस मी तिकडेच चाललो आहे, आपण दोघे लॉजवर जाऊ असे तिला म्हणाला त्यानंतर तिने त्याला नकार दिला आणि ती बस मध्ये चढली त्यानंतर विकी हा देखील बसमध्ये चढला आणि त्याने तिचा हात धरला त्यानंतर ती ओरडू लागल्यावर बस वाहकाने त्याला बस मधून उतरून दिले आणि बस निघून गेली. तिच्यापाठोपाठ पुन्हा तो टाटा गार्डन या ठिकाणी बस स्टॉप वर आला आणि तिथे त्याने तिचा हात धरून पुन्हा गाडीवर बसण्यास सांगितले त्यानंतर प्रकरण पोलिसात पोहोचले असून तपास सुरू असल्याचे समजते.


Spread the love