पुण्यात खळबळ..म्हणून माझ्यावर तब्बल बारा वर्षे ‘ अनैसर्गिक ‘ अत्याचार ?

Spread the love

पुणे जिल्ह्यात एक खळबळजनक घटना पिंपरी इथे उघडकीला आली असून अश्लील व्हिडिओ दाखवून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. आपल्या पतीचे अनेक महिलांसोबत असलेले अनैतिक संबंध पत्नीने उघडे पाडले आणि त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची बदनामी केली म्हणून पतीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत . पत्नीच्या म्हणण्यानुसार हा प्रकार फेब्रुवारी 2009 पासून तर ऑक्टोबर 2021 पर्यंत सुरू होता.

पीडित विवाहित महिलेने चिखली पोलीस ठाणे गाठत पतीच्या विरोधात तक्रार दिली असून तक्रारीत म्हटल्याप्रमाणे फिर्यादीच्या पतीने मोबाईलवर सातत्याने फिर्यादी महिलेला अश्लील व्हिडिओ दाखवले आणि त्यानंतर अनेकदा तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. पुणे जिल्ह्यातील तळवडे, चिखली, गुरसाळे तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे अनेक वेळा त्याने हा प्रकार केला. दरम्यानच्या काळात पतीचे इतर महिलांसोबत असलेले अनैतिक संबंध फिर्यादी महिलेने उघडे पाडले म्हणून पतीने तिला शिवीगाळ करून मारहाण केली आणि घरातून हाकलून दिले असे म्हटलेले आहे.


Spread the love