पुण्यात खळबळ..शाळेकडून पालकाला चक्क बाऊन्सरकडून मारहाण

Spread the love

पुण्यासह शहरातील शाळांमध्ये नागरिकांची होणारी अडवणूक ही बाब काही नवीन राहिली नाही. नागपूर येथे एका शाळेची फी भरण्यासाठी एका महिलेने चक्क शाळेच्या समोरच भीक मागून शाळेचे पैसे देऊन टाकले होते या घटनेनंतर आणखी एक वेगळी घटना पुणे येथील बिबवेवाडी परिसरात उघडकीला आली असून सदर घटनेची परिसरात जोरदार चर्चा आहे.

बिबबेवाडी परिसरातील क्लाईन मेमोरियल स्कूल येथे विद्यार्थी शुल्काबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या पालकाला चक्क बाऊन्सरकडून मारहाण करण्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. बिबबेवाडी पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

धनकवडी येथील मयुरेश पांडुरंग गायकवाड यांनी या संदर्भात पोलिसाकडे तक्रार केली असून पालकाचे निवेदन दोन दिवसांपूर्वी शाळेच्या फायनान्स विभागाने स्वीकारले होते. त्यांना पोहोचही दिली होती मात्र मुख्याध्यापकांची स्वाक्षरी हवी म्हणून ते अडून बसले होते. पालक मोठ्या संख्येने शाळेत येत असल्याने सिक्युरिटी गार्ड ठेवलेले आहेत असे शाळेच्या वतीने सांगण्यात आले आहे .


Spread the love