पुण्यात खळबळ..’ शॉर्ट्स घालतात ‘ म्हणून मुलींना घरात घुसून मारहाण

Spread the love

एक वेगळी अशी घटना पुणे इथे उघडकीस आली असून चंदननगर इथे चक्क शॉर्ट कपडे घातल्याच्या कारणातून पुण्यात काही तरुणींना मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलींना चक्क चप्पलने मारहाण केली असल्याचे त्यांच्या घरमालकिणीचे म्हणणे आहे .चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित तरुणी ह्या खराडी येथील रक्षक नगर परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहत असून त्या वेगवेगळ्या कंपनीत काम करत आहेत . आपल्या जीवनपद्धतीप्रमाणे या संबंधित तरुणी राहत्या परिसरात शॉर्ट कपडे घालून फिरत असायच्या त्यामुळे काही जणांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी या मुलींना राहत्या घरी गाठले आणि चक्क चप्पलने मारहाण केली. घरमालकीणीनं तातडीने चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली.

घरमालकिणीच्या म्हणण्यानुसार, ‘ संबंधित आरोपी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण करत असून यावेळी त्यांनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणींच्या कपड्यांवरून वाद उकरून काढला आहे. बुधवारी रात्री काही आरोपी त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणी शॉर्ट कपडे घालून परिसरात फिरतात, असा आरोप करून भांडणाला सुरुवात केली आणि वाद वाढल्यावर या मुलींना चप्पलने मारहाण केली .

घरमालकीणीनं तातडीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 448, 323, 504, 506, 143, 147, 149 अंतर्गत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तोकडे कपडे घालण्यावरून मारहाण झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून सदर घटनेमागे केवळ हे एकच कारण आहे कि इतरही कारणे आहेत याचा तपास सुरु आहे .


Spread the love