पुण्यात चारचाकी वाहनावर ‘ महाराष्ट्र शासन ‘ अन आत चक्क , तीन जण ताब्यात

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना पुणे शहरात समोर आलेले असून आंध्र प्रदेशातून तब्बल एक कोटी रुपये किमतीचा साडेपाचशे किलो गांजा आणि पंधरा लाख रुपयांचा ऐवज घेऊन अमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या एका महिलेसह तीन जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गाडीवर चक्क महाराष्ट्र शासन असा फलक लावून हा प्रकार सुरू होता.

उपलब्ध माहितीनुसार, संदीप बालाजी सोनटक्के ( वय 29 राहणार दहिवली खोपोली ), निर्मला कोटेश्वरी मूर्ती जुन्नरी ( वय 36 राहणार चिलाकरलूपेठ आंध्र प्रदेश ) महेश तुकाराम परीट ( वय 29 राहणार तुपगाव जिल्हा रायगड ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

नगर पुणे रोडवरील लोणीकंद परिसरात आंध्र प्रदेशातून गांजा घेऊन काहीजण पुण्यात येत असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळालेली होती त्यानुसार सहाय्यक पोलीस पथकाने लोणीकंद परिसरात छापा टाकला आणि आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन मोटारी आणि साडेपाचशे किलो गांजा आणि चार मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहेत.


Spread the love