पुण्यात मार्केट यार्डमध्ये मास्क लावून गोळीबार केला अन ..

Spread the love

पुण्यात एक खळबळजनक अशी घटना भरदिवसा घडलेली असून मार्केट यार्ड परिसरातील एका अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात चोरट्यांनी गोळीबार करून 28 लाख रुपये हातोहात गायब केले आहेत. शनिवारी दुपारी ही घटना घडली असून घटनेनंतर व्यापारी वर्गांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शहरातील मार्केट यार्ड परिसरात एका इमारतीत अंगडिया व्यवसायिक आपला व्यवसाय करतो. दुपारी साडेबाराच्या सुमारास काही चोरटे दुकानात घुसले. त्यांनी त्यांचे चेहरे कापडाने झाकलेले होते. कर्मचाऱ्यांना त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवला आणि पैशाची मागणी केली त्यानंतर त्यांनी गोळीबार देखील केला हे पाहून कर्मचारी घाबरून गेले आणि चोरट्यांनी कार्यालयातील 28 लाख रुपयांची रोकड घेऊन पलायन केले.

सदर घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि परिसरात नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी देखील सुरू केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींचा चोरट्यांचा शोध सुरू केलेला असून भरदिवसा हा प्रकार घडल्याने चोरट्यांना आता पोलिसांचे भय आहे की नाही असा प्रश्न व्यापारी उपस्थित करत आहेत. मार्केटयार्डसारख्या गजबज असलेल्या परिसरात ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.


Spread the love