पुण्यात हार्डवेअरच्या दुकानाला आग , चार जणांचा होरपळून मृत्यू

Spread the love

पुण्यात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना पिंपरी चिंचवड शहरात समोर आलेली असून चिखली परिसरातील पूर्णा नगर इथे दुकानांना भीषण आग लागून यामध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली असून घटनेमध्ये मयत व्यक्तींमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे.

उपलब्ध माहितीनुसार , पूर्णा नगर इथे दुकानांना आग लागली त्यानंतर अवघ्या काही मिनिटात आगीने रौद्र स्वरूप धारण केले. आजूबाजूच्या दुकानांमध्ये आग पसरली आणि चार जणांचा होरपळून यात मृत्यू झालेला आहे. अग्निशामक विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल झालेला होता मात्र चार जणांचे प्राण वाचवण्यात अपयश आलेले आहे. आगीमागचे नेमके कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.

सदर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडालेली असून पिंपरी चिंचवडच्या चिखली येथील सचिन हार्डवेअर अँड इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात एक कुटुंब देखील वास्तव्याला होते. आग लागल्यानंतर बाहेर पडण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र त्यात अपयश आले आणि सर्वांचा होरपळून मृत्यू झाला. दुकानांमध्ये रहिवासी म्हणून असलेल्या या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठलीच काळजी घेण्यात आलेली नसल्याचे समोर आलेले आहे .


Spread the love