पोलीस कारवाईनंतर थेरगाव क्वीन म्हणते ‘ विकून खाईन ‘

Spread the love

पुणे शहरात आणि जिल्ह्यात थेरगाव क्वीन प्रकरण चांगलेच गाजले. अश्लील शब्दांचा वापर करत व्हिडिओ बनवायचे आणि आणि त्यातून सवंग लोकप्रियता मिळवायची असे प्रकार पुणेकरांना आता नवीन राहिलेले नाही मात्र या थेरगाव क्वीनवर कारवाई केल्यानंतर देखील तिची थेरं कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत तिला ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी तिचा मित्र असलेल्या तरुणाला देखील बेड्या ठोकल्या होत्या.

सोशल मीडियावर धमकीवजा व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाची चक्क हात जोडून माफी मागितल्याचे फोटो देखील व्हायरल झाले होते मात्र यापुढे असे व्हिडीओ करणार नाही असे म्हणत त्याने माफी देखील मागितली होती. त्यानंतर थेरगाव क्वीन 9 नाईन या अकाउंटवरून काही व्हिडीओ व्हायरल झालेले असून सदर तरुणीवर याचा काही परिणाम झाल्याचे दिसत नाही. सदर अकाऊंटवरून संबंधित व्हिडिओ व्हायरल झालेला असून हा खोडसाळपणाचा प्रकार आहे आणि संबंधित अकाऊंट तयार करणाऱ्यांचा आम्ही शोध घेत आहोत, असे वाकड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉक्टर विवेक मुगळीकर यांनी सांगितले आहे.

थेरगाव क्वीन या अकाउंटला सोशल मीडियात मोठ्या संख्येने फॉलोवर आहेत त्यामुळे याचा गैरफायदा घेत कुणीतरी दुसरे अकाउंट तयार केले असून त्या अकाउंट वरून देखील थेरगाव क्वीनचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहे. पोलिसांना पोलिसांनी अटक केली त्यावेळचा देखील व्हिडिओ यावर टाकण्यात आलेला असून पोलिस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर संबंधित तरुणीची परिसरात चांगलीच मिरवणूक काढण्यात आली होती. पोलिसांच्या कारवाईचा या थेरगाव क्वीनवर काही परिणाम झालेला दिसत नाही असेच एकंदरीत चित्र आहे.

ओरिजनल थेरगाव क्वीन अकाऊंट कोणते आणि डुप्लिकेट अकाऊंट कोणते आहे तसेच हे विडिओ नक्की कोण व्हायरल करत आहे ? याचा तपास घेण्याचे पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे .


Spread the love