पोलीस पतीचा ‘ हातोडा ‘ बायकोने चुकवला म्हणून संतप्त पतीने चक्क ..

Spread the love

पोलीस म्हटल्यानंतर कायद्याचे पालन करणाऱ्या व्यक्ती असे एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते मात्र बदलापूर येथे एक वेगळीच घटना समोर आली असून दारू पिऊन आलेल्या पोलिसाला पत्नीने जाब विचारला म्हणून संतप्त झालेल्या या पोलिसाने तिच्यावर ब्लेडने वार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. पत्नीच्या तक्रारीवरून या पोलीस पतीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, संजय सोनवणे ( वय 47 ) असे आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तो कार्यरत आहे. चार सप्टेंबर रोजी रात्री तो दारू पिऊन आला त्यावेळी त्याने बायकोसोबत विनाकारण वाद घालण्यास सुरुवात केली. बायकोने विरोध केला असता संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्याने घरातील हातोडा तिच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला मात्र बायकोने त्याचा नेम चुकवला त्यामुळे त्याच्याच हाताला जखम झाली त्याचा राग येऊन त्याने बायकोच्या खांद्यावर आणि कोपर्‍यावर दाढी करण्याच्या ब्लेडने हल्ला करून दुखापत केली, असे पत्नीचे म्हणणे आहे.


Spread the love