प्रियकराच्या नादात विवाहितेने पार केल्या ‘ सगळ्या ‘ मर्यादा , प्रियकर सोडून पाच जण आरोपी

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे उघडकीस आली आहे. प्रेमात आंधळ्या झालेल्या एका विवाहित महिलेने आपल्या बॉयफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीचा अमानुषपणे खून केला आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात मृतदेह झाडावर अडकला आणि आणि या प्रकरणाला वाचा फुटली.

उपलब्ध माहितीनुसार , सचिन दुसाने असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून पत्नी शोभा सचिन दुसाने, तिचा प्रियकर दत्तात्रय शंकर महाजन, संदील स्वामी, अशोक काळे, गोरख नामदेव जगताप, पिंटू उर्फ बाळासाहेब मारूती मोगरी (रा. निफाड), भंगार व्यावसायिक मुकरम जहीर अहेमद अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व जण निफाड येथील रहिवासी असल्याचे समजते.

मयत सचिन दुसाने आणि आरोपी शोभा दुसाने हे पती-पत्नी आहेत. मृत सचिन याला दारुचं व्यसन असल्याने दारू प्यायल्यानंतर तो अनेकदा पत्नी शोभा हिला शिवीगाळ करत त्रास द्यायचा. याचमुळे संसारात एकाकी पडलेल्या शोभा हिचे दत्तात्रय महाजन यांच्यासोबत प्रेमसंबंध सुरू झाले आले आणि त्यांनी प्रेमाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. पतीचा आता अडसर होत असल्याने आरोपी पत्नी शोभा हिने पतीविरोधात सूड उगवण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी निफाडमधील काही जणांना एक लाख रुपयांची सुपारी देण्यात आली.

23 जानेवारी रोजी मारेकऱ्यांनी सचिनची राहत्या घरात निर्घृण हत्या केली. यावेळी आरोपी पत्नी शोभाने प्रियकर आणि अन्य मारकऱ्याच्या मदतीने आपल्या पतीचा चेहरा लोखंडी सळईने ठेचला आणि त्यानंतर आरोपींनी सचिनचा मृतदेह त्याच्या डस्टर कारच्या डिक्कीत टाकला. त्यानंतर ही गाडी पेठजवळच्या कोटंबी घाटात आणली आणि दरीत मृतदेह टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करताना सचिनचा मृतदेह एका झाडाला अडकला आणि त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.


Spread the love