
गेल्या काही महिन्यात वर्षांपासून पुणे शहरात महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना पुणे शहरात समोर आलेले असून प्रेम संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका तरुणीला धमकावले गेल्याची घटना कुमठेकर रोडवर उघडकीला आली आहे. एका व्यक्तीला या प्रकरणी अटक करण्यात आले आहे
प्रज्वल संजय जाधव ( वय 22 राहणार मुंजोबाची बोळ नारायण पेठ ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून विश्रामबाग पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात एका तरुणीने फिर्याद दिलेली आहे.
पीडित तरुणी ही शिक्षणासाठी पुणे शहरात आलेली असून आरोपी जाधव याच्या परिचयाची आहे. जाधव याने तिला प्रेमसंबंध ठेवण्यास सांगितले मात्र तरुणीने त्याला नकार दिला म्हणून जाधव याने तिला कुमठेकर रस्त्यावर अडवले आणि’ माझ्याशी प्रेमसंबंध ठेवले नाही तर तुझे करिअर खराब करतो ‘ अशी धमकी दिली त्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलीस निरीक्षक राहुल फुलंब्रीकर यांच्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या .