फर्निचरवाला फोनच उचलेना म्हणून फटीतून दुकानात डोकावले असताना..

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात उघडकीला आली असून आदर्श नगर येथील एका फर्निचरच्या दुकानात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मोहसीन शेख असे या तरुणाचे नाव आहे.

उपलब्ध माहितीनुसार, नवापूर शहरातील लाकडी फर्निचर आणि जळाऊ लाकूड याचा व्यवसाय करणारे हनीफ शेख यांचा एकुलता एक मुलगा मोहसिन हा दुकानात असताना फर्निचर दुकानावर कामावर आलेल्या एका व्यक्तीने त्याला फोन केला त्यावेळी त्याने फोन उचलला नाही मात्र दरवाज्यातून डोकावून पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे या व्यक्तीच्या लक्षात आले आणि त्याने ही माहिती परिसरातील नागरिकांना दिली.

नागरिकांनी तात्काळ दुकानाचा दरवाजा उघडून त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. नवापूर पोलिसात याप्रकरणी नोंद करण्यात आलेली असून मोहसीन हा उच्चशिक्षित होता मात्र त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप पर्यंत स्पष्ट झालेले नाही. सदर प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत .


Spread the love