फाटक्या जीन्ससाठी मोजलेत तब्बल एक कोटी २८ लाख , काय आहे खासियत ?

Spread the love

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम राहिलेला नाही असाच एक प्रकार सध्या जोरदार चर्चेत आलेला असून जुन्या मळकट असलेल्या दोन जीन्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे. एका जीन्स पॅन्टची किंमत फारतर किती असू शकेल हजार.. दोन हजार.. पाच हजार.. दहा हजार मात्र या जीन्स पॅन्टची किंमत तब्बल एक कोटी 28 लाख रुपये आहे. धक्कादायक म्हणजे ही जीन्स गेली शंभर वर्ष कोणी धुतलेली देखील नाही त्यामुळे या अनोख्या जीन्सची चर्चा सुरू झाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर जीन्स ही एका उत्खननात सापडलेली असून अमेरिकेतील दोन उद्योजकांनी ती खरेदी केलेली आहे. न्यू मेक्सिको इथे या जीन्सचा लिलाव करण्यात आलेला होता. तब्बल दोन दिवस या जीन्ससाठी बोली लावण्यात आलेली होती त्यावेळी या अमेरिकेतील दोन उद्योजकांनी या जीन्ससाठी तब्बल एक कोटी 28 लाख रुपये मोजले आहेत.

वॉल स्ट्रीट जनरल यांनी या संदर्भात वृत्त दिले असून 1980 साली अमेरिकेत उत्खनन सुरू असताना दोन जीन्स सापडल्या होत्या त्यावेळी त्यांचा कसून अभ्यास करण्यात आला तेव्हा त्या जीन्स किमान शंभर वर्षे जुन्या असल्याचा देखील शोध लागला. अठराव्या शतकात ज्या कंपन्या जीन्स पॅन्टसाठी प्रसिद्ध होत्या या कंपन्यांनी या जीन्स बनवल्या असे सांगण्यात येत असून या जीन्सचे फोटो सध्या व्हायरल झालेले आहेत.


Spread the love