बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचे शरद पवारांवर खळबळजनक आरोप

Spread the love

राज्यातील राजकीय घमासनात शिवसेनेच्या बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बुधवारी एक खळबळजनक आरोप केलेला असून त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. दीपक केसरकर यांनी मुंबई येथे बोलताना शिवसेनेतून बाहेर पडलेले छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या फुटीच्या वेळी त्यांना शरद पवार यांचे आशीर्वाद होते असे म्हटले आहे.

काय म्हणाले दीपक केसरकर ?

पवार यांनी अनेकदा खाजगीमध्ये बोलताना शिवसेनेच्या फूटीबाबत राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी मदत केलेली आहे. पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. भुजबळ राज यांच्या फुटीच्या वेळी देखील त्यांना पवार यांचे आशीर्वाद होते यावेळी मातोश्री कधीही सिल्वर ओकच्या दारात गेल्याचे मी पाहिलेले नाही. शिवसेनाप्रमुखांना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणे कधीही मान्य नव्हते. माझ्या पक्षात मी शेवटचा माणूस राहिलो तरी काँग्रेससोबत जाणार नाही असेही ते म्हणायचे यामुळे शिवसैनिक कधीही पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीने येत्या निवडणुका एकत्र लढण्याची तयारी पवार करत असले तरी त्या फुटीनंतर मातोश्री कधीही सिल्वर ओक इथे आश्रयाला गेली नाही असेही ते म्हणाले .


Spread the love