बंद शेडमध्ये घुसण्यासाठी बिबट्याने ‘ डोकं चालवलं ‘ अन ..

Spread the love

गेल्या काही वर्षांपासून बिबट्या नागरी वस्तीत करण्याचे अनेक प्रकार उघडकीला आले आहेत. अशीच एक घटना सिल्लोड तालुक्यात उघडकीला आली असून पिंपळदरी परिसरात बिबट्याने एका शेतकऱ्यांच्या शेडमध्ये बांधलेल्या दोन शेळ्या फस्त केले आहेत. सर्व बाजूंनी तारेचे कंपाउंड असतानादेखील बिबट्याने चक्क शेडच्या बाहेरून खड्डा करत पिंजऱ्यात प्रवेश केला आणि या शेळ्यांचा फडशा पाडला.

पिंपळदरी शिवारात एका शेतकर्‍याने शेतात पत्र्याचे शेड उभारले आहे. तिथे नियमितपणे ते शेळ्या बांधतात मात्र जमिनीवर कोणताही कोबा केलेला नसल्याने बिबट्याने शेडच्या बाहेरून उकरण्यास सुरुवात केली आणि हळूहळू पुढे सरकत तो पिंजऱ्यात घुसला. पिंजऱ्यात आल्यानंतर त्याने दोन्ही शेळ्या मारून बाहेर ओढून फस्त केल्या.

सकाळी शेतकरी आले त्यावेळी त्यांना एकही शेळी दिसून आली नाही तर शेडच्या बाजूला एक भुयार केल्याचे आणि तो शेडमध्ये आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी यांना बोलावण्यात आले आणि त्यांनी पंचनामा केला त्यावेळी सदर ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आलेले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असल्याने वनविभागाने त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.


Spread the love