बहिणीला सोडवायला म्हणून गेला अन नणंदेसोबत बांधून ‘ शुभमंगल ‘

Spread the love

सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच विवाहाची जोरदार चर्चा सुरू असून बिहार येथे एका मुलाला पकडून त्याचे जबरदस्तीने लग्न लावून देण्याचा प्रकार समोर आलेला आहे. बिहारमधील समस्तीपूर येथे ही घटना घडलेली असून सदर मुलगा त्याच्या बहिणीला तिच्या सासरी सोडायला गेलेला होता त्यानंतर बहिणीच्या नणंदेचे लग्न जुळत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ती घरी होती याचा फायदा घेत सासरच्या लोकांनी त्याला पकडून त्याचा विवाह पार पाडलेला आहे.

बहिणीची ननंद ही अनेक वर्षांपासून लग्नाशिवाय घरी राहत होती त्यानंतर एके दिवशी तिच्या वहिनीचा भाऊ तिला सोडण्यासाठी आलेला असताना बहिणीच्या सासरच्या लोकांनी त्याला पकडले आणि तिच्या नणंदेसोबत जबरदस्तीने त्याचे लग्न लावून दिले. विनोद कुमार असे पीडित नवरदेवाचे नाव असून मोडवा खुनेश्वर येथील एका मंदिरात हा विवाह सोहळा पार पडला. मुलाला सहज म्हणून ते मंदिरात घेऊन गेले होते मात्र तिथे गेल्यानंतर त्याला पकडून मुंडावळ्या बांधण्यात आल्या आणि त्यानंतर मुलीला वधूच्या पोशाखात त्याच्यासमोर उभे केले.

सासरच्या व्यक्तीनी दमदाटी करत त्याला वधूच्या गळ्यात हार घालायला लावले आणि कुंकू लावायला सांगितले. विनोद कुमार याने आपले लग्न मनाविरुद्ध लावलेले असून आपल्याला हे लग्न मान्य नाही असे म्हटलेले आहे. सदर लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मुलाचा हात जबरदस्तीने पकडून त्याच्या हातात हार देऊन मुलीच्या गळ्यात घालण्यासाठी सांगण्यात येत आहे. मुलगा माझ्या इच्छेने लग्न करेल असे सांगत आहे मात्र व्हिडिओमधील इतर व्यक्ती त्याचे काहीही ऐकून घेत नाहीत.

सासरच्या मंडळींच्या म्हणण्यानुसार मुलगा जेव्हा आपल्या बहिणीला सोडवायला घरी यायचा तेव्हा तो तिची नणंद असलेल्या मुलीसोबत तासन्तास भेटत असायचा. त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध देखील होते त्यामुळे आम्ही हा विवाहसोहळा पार पडलेला आहे. लग्न झाल्यानंतर मात्र पत्नीला तिच्या घरीच ठेवून विनोदकुमार हा स्वतःच्या घरी पळून आलेला आहे. दोन्ही कुटुंबात सध्या वादावाद सुरू असून दमदाटी करून केलेल्या या लग्नाला विनोद त्याचा नकार आहे तर मुलीकडील मंडळी मात्र मुलगी नांदायला घेऊन जा असे म्हणत त्याला विनंती करत आहेत.


Spread the love