बायकोची नाराजी ‘ अशी ‘ दूर केली , पोलिसात गेली होती विवाहिता

Spread the love

देशात एक खळबळजनक अशी घटना उत्तर प्रदेशातील आग्रा इथे समोर आलेली असून सातत्याने कानाला इयरफोन लावून गाणी ऐकण्याची सवय असल्याने पती-पत्नीत वाद झाल्यानंतर संतप्त झालेल्या पतीने अखेर बायकोच्या कानातून इयरफोन काढला आणि तो फोडून टाकला. संतापलेली बायको त्यानंतर अखेर वैतागून माहेरी निघून गेलेली होती. तीन महिने ती आलीच नाही. पतीने देखील तिला आणण्यासाठी कुठलाही पुढाकार घेतला नाही म्हणून तिने अखेर पोलिसात तक्रार केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , ताजगंज भागातील हे प्रकरण असून जगदीश पुरा येथील एका तरुणीसोबत तरुणाचा विवाह झालेला होता. त्यांना एक मुलगी देखील असून तीन महिन्यांपूर्वी पती-पत्नीत भांडण झालेले होते. इयरफोन लावून आपली पत्नी कोणासोबत तरी बोलते असा संशय देखील या पतीच्या मनात यायचा आणि त्यातून त्यांच्यात अनेकदा वाद झालेला होता.

संतप्त झालेल्या पतीने अखेर तिच्या कानातील इयरफोन काढला आणि तो फोडून टाकला त्यानंतर महिला संतापून माहेरी निघून गेली. आपला पती घ्यायला आज येईल उद्या येईल असे तिला वाटत होते मात्र पती आलाच नाही त्यानंतर अखेर ती पोलिसात पोहोचली त्यावेळी पोलिसांनी तिला समुपदेशक असलेले व्यक्ती यांच्याकडे पाठवले तेव्हा तिने ‘ मला नवीन इयरफोन घेऊन दिला तरच मी येईल अशी अट टाकली ‘ आणि पतीने अखेर एक नवीन इयरफोन तिला घेऊन दिलेला आहे.


Spread the love