
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या अर्थात ‘ बालभारतीचे डोमेन विकणे आहे ‘ याप्रकरणी जाहिरात करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणाचा शोध घेण्यासाठी बालभारतीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी कारवाई सुरुवात केलेली आहे.
महाराष्ट्रातील पाठ्यपुस्तकांची निर्मिती छपाई करणाऱ्या बालभारती संकेतस्थळाचे डोमेन 2000 युएस डॉलरला विकणे आहे अशी जाहिरात गुगलवर करण्यात आलेली होती. बालभारतीची पाठ्यपुस्तके याच पोर्टलवर ई साहित्य स्वरूपात उपलब्ध आहेत आणि अनेक विद्यार्थी आणि पालक शिक्षक या संकेतस्थळाशी जोडलेली आहेत. पीडीएफ स्वरूपात ही पुस्तके डाऊनलोड देखील करता येतात
बालभारती डॉट इन हे अधिकृत डोमेन बालभारतीचे असून 2005-2006 या वर्षात ते घेण्यात आलेले आहे असे असताना कुणीतरी डोमेनबाबत खोडसाळपणा केला आणि हे डोमेन विकण्याची गुगलवर जाहिरात केलेली होती. कायदेशीर कारवाई प्रक्रियेला आता सुरुवात करण्यात आलेली असून हा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असे बालभारतीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले आहे.