बाहेरून स्पा आतून भलताच प्रकार , मोशीतील ‘ त्या ‘ स्पा सेंटरवर कारवाई

Spread the love

पुण्यात अनेक ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली भलतेच प्रकार सुरू असून अशीच एक ताजी कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने केलेली आहे. सदर प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आलेली असून शनिवारी 29 तारखेला रात्री मोशी येथील स्पाईन रोड परिसरात ही कारवाई करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अटक केलेली महिला आरोपी आणि निखिल गजानन चौधरी ( वय 32 राहणार खेड ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला स्पाईन रोड येथे एका स्पा सेंटरमध्ये हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर कारवाई करण्यात आली . पीडित महिलेची सुटका करण्यात आली तसेच एका महिला आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे.


Spread the love