बीडच्या डॉक्टरांना ‘ तो ‘ एक फोन आला अन त्यानंतर ..

Spread the love

महाराष्ट्रात फसवणुकीच्या अनेक घटना घडत मिळत असल्या तरी लोक देखील अशा भामट्यांना सहजासहजी बळी पडतात अशीच एक घटना बीड येथे उघडकीस आली असून तुमच्या नावाने रुग्णाच्या वडिलांची तक्रार आहे असे बतावणी करत एका तोतया उपनिरीक्षक याने बीड येथील एका डॉक्टरला ऑनलाईन 90 हजार रुपयांचा चुना लावला आहे. सात डिसेंबर रोजी सकाळी शहरातील मसरत नगर येथे हा प्रकार उघडकीस आला आहे.

डॉक्टर पटेल शेख नसिरुद्दिन शेख बशीर उद्दीन यांचे शहरातील मसरत नगर येथे क्लिनिक आहे. 7 डिसेंबर रोजी ते सकाळी क्लिनिक मध्ये असताना साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. समोरून बोलत असलेल्या व्यक्तीने आपण नागपूर येथून बोलत असून आपले नाव पीएसआय विजय पाटील असे असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने एका रुग्णाच्या वडिलांची तक्रार आहे. तुम्ही नागपूर पोलीस ठाण्यात आला नाही तर तुम्हाला अटक करावी लागेल, अशी बतावणी देखील त्याने केली.

अचानक आपल्यासोबत झालेल्या या प्रकारानंतर डॉक्टर घाबरुन गेले आणि त्यांनी पाटील याला काही पर्याय असल्यास सुचवले त्यावर पाटील याने तडजोड करण्याच्या नावाखाली त्याने रुग्णांचे वडील म्हणून दुसऱ्या एका भामट्याशी डॉक्टर पटेल यांचे बोलणे करून दिले. मला 90 हजारांचा आपल्याकडे खर्च झाला असून तो द्या अन्यथा पोलिसात तक्रार दाखल करेल, अशी धमकी त्याने दिली त्यानंतर डॉक्टर पटेल यांनी घाबरून त्यांच्या डॉक्टर मुलीचा गुगल पे वरून तब्बल 90 हजार रुपये मोहम्मद साजिद नामक एका खात्यावर पाठवले.

सदर प्रकरण मिटले आहे असे वाटत असतानाच डॉक्टर पटेल यांना पुन्हा एकदा फोन करून न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून ती मिटवण्यासाठी आणखी 44 हजार रुपयांची गरज आहे असे सांगून त्यांच्याकडे 44 हजार रुपयांची मागणी केली. एकदा प्रकरण मिटल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा पैसे मागण्यात आल्यानंतर डॉक्टरांना शंका आली आणि त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या अनोळखी भामट्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.


Spread the love