बीडमध्ये खळबळ..हनी ट्रॅपचे पैसे घ्यायला सोबत चक्क भावाला घेऊन

Spread the love

महाराष्ट्रात हनी ट्रॅप हे गुन्हेगारांचे सोपे साधन बनलेले असल्याच्या अनेक घटना उघडकीस आलेल्या आहेत, अशीच एक घटना बीड येथे उघडकीस आली असून सदर महिलेला रक्कम घेताना रंगेहाथ जेरबंद करण्यात आलेले आहे. बीड शहरात या कारवाईची जोरदार चर्चा आहे.

दोन वर्षापासून एका तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या युवकाला बलात्काराचा गुन्हा नोंदवण्याची धमकी देत तीन लाखांची खंडणी मागणाऱ्या महिलेला शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. तिच्या मावस भावाला देखील या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले आहे. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता शहरातील एका हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली.

उपलब्ध माहितीनुसार, पाटोदा तालुक्यातील 24 वर्षीय तरुण नांदेड येथे एका वॉटर फिल्टर कंपनीत चालक म्हणून कामाला होता. तिथे त्याची ओळख एका 25 वर्षीय महिलेशी झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. गेले काही दिवस ते रिलेशनशिपमध्ये देखील होते मात्र नंतर त्यांच्यात वेगवेगळ्या कारणांवरून भांडणे होऊ लागली आणि आणि त्यानंतर या महिलेने तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणार, अशी धमकी देण्यास सुरू केले.

तरुणाने असे काही करू नकोस अशी विनंती केली मात्र तिने त्याच्या बदल्यात तीन लाख रुपयांची मागणी या तरुणाकडे केली. तेच पैसे 19 डिसेंबर रोजी घेण्यासाठी ती आपल्या मावस भावाच्या सोबत बीड येथे आली होते. त्यावेळी तरुणाने देखील पोलिसात फिर्याद केलेली असल्याने पोलिसांनी वेळीच कारवाई करत या महिलेला बेड्या ठोकल्या आहेत .


Spread the love