बीड हादरलं..पोटात दुखतंय म्हणून दवाखान्यात नेले तर चक्क ? आरोपी इतका जवळचा की

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना बीड इथे उघडकीस आली आहे . बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तिच्या सख्ख्या भावाने आणि चुलत भावाने दोघांनी मिळून वेळोवेळी अत्याचार केल्याची गंभीर घटना घडलेली आहे .

आरोपी भावांनी रक्त्याच्या नात्याला काळिमा फासत आपल्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केले आणि त्यातून ती गर्भवती राहिली आणि प्रकरण पोलीसांपर्यत पोहचले. संबंधित आरोपी भाऊ बऱ्याच दिवसांपासून आपल्या बहिणीचं लैंगिक शोषण करत असल्याची देखील माहिती समोर आली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, पीडित मुलीचं पोट दुखू लागल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा ती चक्क सहा महिन्यांची गरोदर असल्याचे कळताच आईवडिलांच्या पायाखालची वाळूच सरकली. पोलिसांनी पीडित मुलीच्या सख्ख्या भावासह चुलत भावाविरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून अन्य एका तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही भावांना अटक केली असून तपास सुरु असल्याचे समजते .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय पीडित मुलगी आपले आई वडील आणि भावासोबत बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. 17 वर्षीय सख्खा भाऊ आणि 15 वर्षीय चुलत भाऊ यांनी बऱ्याच वेळा या पीडित मुलीवर अत्याचार केले. अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता . सातत्याने होत असलेल्या या अत्याचारातून तिला पोटाचा त्रास होऊ लागला म्हणून एका खाजगी रुग्णालयात तिला दाखल केले असता पीडित मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याची धक्कादायक बाब पुढे आली.


Spread the love