बेडरेस्टवरील बायकोला म्हणाला ‘ तू काय कामाची ‘, महिलेचे धक्कादायक खुलासे

Spread the love

देशात घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना गोवा येथे उघडकीला आली असून तसले व्हिडिओ पाहण्याच्या नादी लागलेल्या एका पतीने आपल्या पत्नीला अनेकदा अनैसर्गिक पद्धतीने शारीरिक संबंध ठेवण्यास मजबूर केले आणि आणि त्यानंतर काही दिवसांनी ती गर्भवती झाली असताना देखील त्याने तिच्यावर वेळोवेळी जबरदस्ती केली अखेर त्याच्या त्रासाला वैतागून पीडित महिलेने पोलिसात धाव घेतली. धक्कादायक बाब म्हणजे दोघेही उच्चभ्रू कुटुंबातील सुशिक्षित असून दुर्दैवाने कौटुंबिक बाब जगजाहीर झालेली आहे.

सदर घटना ही गोवा येथील असून पीडिता ही मध्य प्रदेशातील इंदोर येथील असल्याचे समजते .गोव्यात राहणारा तिचा पती परदेशी ‘तसले ‘ व्हिडीओ पाहून जबरदस्तीने तिला तसे प्रकार करण्यास भाग पडत होता . तिला त्रास होत होता मात्र पत्नीने नकार दिल्यानंतरही तो ऐकत नव्हता. ती गर्भवती असतानाही त्याने तिचे ऐकले नाही आणि त्यातून या महिलेचा गर्भपात झाला.सध्या पीडिता इंदूरमधील बजरंगनगरमध्ये राहत असून तिने कोर्टात याबाबत तक्रार दाखल केली आहे. 2 वर्षे सुरू असलेल्या सुनावणीनंतर कोर्टाने महिलेच्या पतीवर एक लाख रुपयांचा दंड ठोठावला असून प्रत्येक महिन्याला तिला पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे महिलेचे म्हणणे ?

माझं लग्न 11 मार्च 2019 मध्ये गोव्यातील मापुसा टाऊन निवासी राहुल बिजवेसोबत झालं होतं. राहुल पोस्टल असिस्टंट पदावर कार्यरत असून तो मुळचा नागपूरचा राहणारा आहे. लग्नाच्या 12 दिवसांनंतर सासरच्या मंडळींनी माझ्याकडून 10 लाखांची मागणी केली. पैसे दिले नाही म्हणून त्यांनी त्रास देणे सुरु केले. लग्नाच्या वेळी दीर विशाल बिजवेने माझ्याकडून पैसे घेतले. तो रेल्वेमध्ये लोको पायलट आहे. दीर आणि सासूने मिळून माझ्याकडून दीड लाखांहून अधिक रुपये स्वत:च्या खात्यात ट्रान्सफर करायला सांगितलं. पतीदेखील तिला अनैसर्गिक सेक्स करण्यासाठी जबरदस्ती करीत होता. यादरम्यान मला दिवस गेले. शारिरीकदृष्ट्या अशक्त असल्या कारणाने डॉक्टरांनी मला बेड रेस्ट करायला सांगितलं.

डॉक्टरांनी सेक्स करण्यास मना केली होती मात्र तरीही पती त्रास देत होता यादरम्यान मला रक्तस्त्राव सुरू झाला. डॉक्टरांनी गर्भपातापासून वाचण्यासाठी त्यांनी इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. काही कामाची नसल्याचं म्हणत पतीने यानंतर मला इंदूरला पाठवलं. दरम्यान नागपूरमध्ये गेले असता माझ्या सासऱ्याचं निधन झालं. प्रकृती ठीक नसतानाही मी सासरी नागपूरला गेले आणि तेथेही पतीने माझ्यासोबत अनैसर्गिक सेक्स केलं. यानंतर मला रक्तस्त्राव सुरू झाला. डॉक्टरांनी सोनोग्राफी केली तर गर्भातील बाळाच्या किडनीला सूज आल्याचं लक्षात आलं. यावर पतीने उपचार केले नाही. 30 ऑगस्ट 2019 रोजी पाचव्या महिन्यात मला एक प्रीमॅच्युअर मूल जन्माला आलं आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.


Spread the love