भटक्या कुत्र्यांना खाऊ घालताय का ? सर्वोच्च न्यायालय म्हणतेय की..

Spread the love

शहरातील अनेक नागरीक परिसरात राहणाऱ्या भटक्या कुत्र्यांना अन्न आणून खाऊ घालत असतात त्यामुळे अनेकदा या आधीदेखील सोसायटीत वाद झालेले आहेत. भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घातल्याने त्यांची पैदास वाढते आणि लहान मुलावर देखील ते हल्ले करत असल्याचे प्रकार होतात त्यामुळे सोसायटीतील लोकांमध्ये मतभेदही आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अशाच एका प्रकरणावर लोकांची सुरक्षा आणि प्राण्यांच्या हक्क याचा समतोल राखावा. जे लोक भटक्या कुत्र्यांना खाऊ घालतात त्यांनी त्यांच्या लसीकरणाची जबाबदारी घ्यावी तसेच त्यांनी कुणावर हल्ला केला तर संबंधित व्यक्तींच्या उपचाराचा खर्च देखील करण्यासाठी त्यांना जबाबदार ठरवले जाऊ शकते, असे म्हटले आहे. न्यायालयाने यासंदर्भात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून निरपराध लोकांना वाचवण्याची गरज आहे असेही सांगितलेले आहे.

मुंबई पुणे यासारख्या शहरी भागात भटक्या कुत्र्यांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी भटक्या कुत्र्यांना मारण्याचे आदेश दिले आहेत मात्र अनेकदा प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संघटना याच्या विरोधात उभ्या राहतात त्यामुळे भटक्या कुत्र्यांवर कारवाई केली जात नाही. त्यांना परिसरातील काही नागरिक अन्न खाऊ घालत असल्याने त्यांची संख्या वाढतच राहते. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत राहिल्याने अनेकदा त्यांनी अल्पवयीन मुलामुलींवर देखील हल्ले केले आहेत. त्यात काही जणांनी प्राण गमावले आहेत या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे.


Spread the love