भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचा खूनच , गोवा पोलीस म्हणतात की..

Spread the love

भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार असलेल्या सोनाली फोगाट यांचा खून झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात निदर्शनास आले असून सोनाली यांचा पीए असलेला सुधीर सांगवान आणि त्याचा एक साथीदार सुखविंदर सिंग या दोन जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सोनाली यांच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा आढळून आलेल्या होत्या त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

सोनाली फोगाट ह्या काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेल्या होत्या. टिकटॉक ज्यावेळी सुरू होते त्यावेळी सोनाली फोगाट या स्टार बनलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सोनाली यांचा खून झालेला आहे असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता . गोवा येथे हा प्रकार उघडकीला आला होता . आधी खुनाचा गुन्हा दाखल करा आणि त्यानंतर तुम्ही पोस्टमार्टेम करा, अशा भूमिकेवर कुटुंबीय ठाम होते त्यावेळी पोलिसांनी त्यांचे म्हणणे मान्य करत शवचिकित्सेला गुन्हे दाखल केल्यानंतर सुरुवात केली होती.

संपूर्ण पोस्टमार्टम हे कॅमेरा करण्यात आले आणि त्यानंतर सोनाली फोगाट यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. तो घेऊन ते हिसार येथे रवाना झाले. सोनाली फोगाट यांना हृदयविकाराचा झटका आला असे सांगण्यात आले होते मात्र त्यांचा खून झाला असल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे . सोनाली फोगाट यांच्या कुटुंबीयांनी देखील या प्रकरणी त्यांचा पीए आणि त्याचा मित्र याच्यावरच संशय व्यक्त केलेला असून तपास सुरू असल्याचे समजते तर गोवा पोलिसांच्या दाव्यानुसार आरोपीनी खुनाची कबुली दिली आहे.


Spread the love