मद्यधुंद अवस्थेत मार्केटयार्डच्या हॉटेलमध्ये उच्चभ्रू महिलेचा ‘ धिंगाणा ‘, पोलिसांना तर चक्क..

Spread the love

पुणे शहरातील जीवन धावपळीचे झालेले असल्याने उच्चभ्रू कुटुंबातील अनेक महिला घरी स्वयंपाक न करता हॉटेलच्या जेवणाला प्राधान्य देतात. हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथे अनेकदा गर्दी असते त्यामुळे तर दुसरीकडे पोटात भूक लागलेली असल्याने कर्मचाऱ्यांसोबत उद्धट वर्तनाचे देखील प्रकार समोर येतात अशीच एक ताजी घटना मार्केट यार्ड परिसरातील श्री सागर हॉटेल इथे समोर आलेली असून शुक्रवारी 21 तारखेला रात्री अकराच्या सुमारास एका महिलेने हॉटेलमध्ये जोरदार गोंधळ घातलेला आहे. तिथे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगठ्याचा देखील तिने चावा घेतल्याचा प्रकार समोर आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, श्री सागर हॉटेल इथे ही महिला जेवणासाठी आलेली होती. तिला जेवणात गरमागरम भाकरी हवी होती मात्र हॉटेलमध्ये गर्दी असल्याकारणाने शक्य झाले नाही म्हणून तिने तात्काळ हॉटेल डोक्यावर घेत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ सुरू केली. सदर महिला ही दारूच्या नशेत होती त्यावेळी तिने हॉटेल कर्मचाऱ्यांना शिव्या घालायला सुरुवात केली. गरम भाकरी का दिली नाही असे म्हणत ती हॉटेलमध्ये जेवत असलेल्या इतर लोकांकडे धावली आणि त्यांच्या ताटात तिने पाणी ओतून दिले.

हॉटेलचे मॅनेजर यांनी याप्रकरणी पोलिसांना खबर दिली. पोलीस हॉटेलमध्ये आले त्यावेळी ते महिलेची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होते मात्र तिने त्यांना दाद दिली नाही अखेर तिला कसेबसे करत मार्केट यार्ड येथील पोलीस ठाण्यात घेऊन येण्यात आले त्यावेळी तिने सोबतच्या कर्मचाऱ्यांसोबत देखील गैरवर्तन केले आणि त्यांच्या युनिफॉर्मवरील नाव वाचून त्यानुसार त्यांना शिवीगाळ केली . ‘ मी कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का ? ‘ असे देखील तिने धमकावले. तिला पकडण्यासाठी महिला पोलीस शिपाई आल्या त्यावेळी तिने त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला असे देखील फिर्यादीत म्हटलेले असून सध्या तिला अटक करण्यात आलेली आहे.


Spread the love