‘ मला संन्यास घ्यायचा आहे तू घटस्फोट दे ‘ , डॉक्टरला लग्नानंतर आठ वर्षांनी साक्षात्कार

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आलेली असून एका विवाहित व्यक्तीने आपल्या पत्नीला ‘ मला संन्यास घ्यायचा आहे तू लवकरात लवकर मला घटस्पोट दे ‘ असे म्हणत तिचा छळ केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सदर व्यक्ती हा डॉक्टर असून आपल्याला क्लिनिक टाकायचे आहे त्यासाठी तू माहेरहून पैसे घेऊन ये असे म्हणत तिला त्रास देखील दिला असेही पीडितेचे म्हणणे आहे. सदर प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, सदानंद मोरे ( वय 35 वर्ष ) असे आरोपीचे नाव असून त्याचा 2014 मध्ये विवाह झालेला होता. डॉक्टर असल्याकारणाने आपल्याला स्वतःचे क्लिनिक टाकायचे आहे त्यासाठी आणि घरावरील कर्ज फेडण्यासाठी तू वडिलांकडून पैसे घेऊन ये असे सांगत आरोपी तिचा तिचा छळ करत होता. आरोपीने त्याच्या सासऱ्यांना देखील पैशाच्या कारणावरून शिवीगाळ केलेली असून त्याच्या बहिणीने देखील पीडित महिलेला त्रास दिला असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. अखेर त्याची पत्नी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीसोबत इतर तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .


Spread the love