महाराष्ट्र हादरला..अल्पवयीन मोलकरणीबाबत मालकिणीने केल्या क्रौर्याच्या मर्यादा पार

Spread the love

महाराष्ट्रात एक संतापजनक अशी घटना मुंबई इथे उघडकीस आली असून कामावर उशिरा येणाऱ्या एका अल्पवयीन मोलकरणीला चक्क निर्वस्त्र करून जबर मारहाण केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना अंधेरीतील वर्सोवा भागात उघडकीस आली आहे. पीडितेच्या भावाने सदर मालकिनीविरोधात वर्सोवा पोलिसात गुन्हा दाखल केला असून या मारहाणीत अल्पवयीन मुलीच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , पीडित 17 वर्षाय मुलगी अंधेरी पश्चिमेला वर्सोवा परिसरात एका घरी घरकाम करते. 6 डिसेंबर रोजी तिला पोहचण्यास उशीर झालेला असताना कामासाठी ती घरी पोहचली असताना रागाने लाल झालेल्या मालकिनीने मारहाण करण्यास सुरुवात केली. मालकिणीने तिला चक्क विवस्त्र केले आणि मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे या मालकिणीने चक्क पीडित मुलीच्या मोबाईलमध्ये तिचा न्यूड व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला आणि तिला चपलेने मारहाण केली.

मालकिनीने केलेल्या या मारहाणीमुळे अल्पवयीन पीडितेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेच्या भावाला ह्या प्रकाराची माहिती मिळताच त्याने वर्सोवा पोलीस ठाणे गाठत सदर मालकिनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बाल संरक्षण अधिनियमानुसार मारहाण, छेडछाड, अपमान आणि बाल संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल केला असून याआधी देखील अशा घटना समोर आलेल्या असल्याने घरकाम करणाऱ्या महिलांना संरक्षण मिळावे म्हणून कडक कायदा करण्याची गरज आहे .

कामावर उशिरा येणे किंवा घरकामात काही क्षुल्लक चूक होणे अशा कारणांवरुन घरकाम करणाऱ्या मुलींना, महिलांना घर मालकांकडून मारहाण होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अल्पवयीन मुलींना कामावर ठेवून त्यांच्याकडून अधिक काम करुन घेणे, मारहाण करण्याच्या घटना देखील अधिक आहेत. सदर प्रकारात अशा आरोपींना कठोर शिक्षा होत नसल्याने देखील आरोपींचे फावते आहे .


Spread the love