महाराष्ट्र हादरला..आई मुलीला चहा द्यायला तिसऱ्या मजल्यावर गेली अन त्याचवेळी..

Spread the love

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना कोल्हापूर येथे गडहिंग्लज तालुक्यात उघडकीला आली असून शहरातील नादीवेस परिसरात राहणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणीने राहत्या घरातील तिसऱ्या मजल्यावर स्वतःच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रज्ञा बाळासाहेब खोत ( वय 25 ) असे तिचे नाव असल्याचे समजते. रविवारी दिनांक दहा तारखेला ही घटना उघडकीला आली असून अद्यापपर्यंत तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

प्रज्ञा हिने अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेतले होते आणि त्यानंतर ती पुणे येथे एका कंपनीत नोकरीला होती. कोरोना संकट आल्यानंतर तिला घरातून काम करण्याची कंपनीने मुभा दिली होती म्हणून गेल्या दोन वर्षांपासून ती घरातूनच काम करत होती.

रविवारी दहा तारखेला नेहमीप्रमाणे जेवण केल्यानंतर ती राहत्या घरातील तिसऱ्या मजल्यावर काम करण्यासाठी गेली होती त्यावेळी दुपारी आई तिला चहा देण्यासाठी तिच्या खोलीकडे गेली मात्र तिने दरवाजा उघडला नाही म्हणून नातेवाईकांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता तिने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले त्यानंतर या प्रकाराची पोलिसात खबर देण्यात आली.

प्रज्ञा हिचे आई-वडील दोघेही शिक्षक असून सेवानिवृत्त झालेले आहेत तर प्रज्ञा हीदेखील अत्यंत हुशार आणि मनमिळावू होती. पदवीनंतर तिला चांगल्या कंपनीत नोकरी देखील मिळाली होती. अलीकडे तिच्या लग्नाचा देखील बेत सुरू होता मात्र अचानकपणे तिने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली असल्याने तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलेला आहे.


Spread the love