
आजी म्हटलं की नातवाचा आईपेक्षा जास्त जीव हा अनेकदा आजीवर असतो मात्र या नात्याला काळीमा फासणारी एक घटना नाशिक जिल्ह्यात हरसूल येथे समोर आलेली असून हातात असलेल्या कड्याने आजीच्या चेहऱ्यावर जोरदार वार करत नातवाने तिचा जीव घेतलेला आहे. पोलिसांनी आरोपी नातवाला ताब्यात घेतले असून गंगाबाई गुरुवर गुरव असे या सत्तर वर्षीय आजीचे नाव आहे. त्यांचा नातू दशरथ गुरव याने आपल्या आजीची हत्या केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मंगळवारी सकाळी हा प्रकार घडलेला असून अत्यंत किरकोळ कारणावरून आजी आणि त्यात भांडण झालेले होते त्यामुळे त्याने संतापाच्या भरात हातातील आजीवर त्याच्या हातातील कड्याने वार केला त्यामध्ये आजीच्या उजव्या डोळ्याजवळ गंभीर जखम झाली. नातवाच्या हातातील कडे हे लोखंडी असल्याने मोठ्या प्रमाणात आजीच्या डोळ्याजवळ जखम झाली आणि मोठा रक्तस्राव झाला आणि त्या बेशुद्ध झाल्या आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. सदर प्रकरण उघडकीला येताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून गंगुबाई गुरव यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवलेला आहे. मारेकरी नातवाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.