माझ्या नवऱ्याचा नाद सोड , बॉसची बायको सांगून थकली होती अन..

Spread the love

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या उत्तर प्रदेशात समोर आलेले असून आपल्या बॉससोबत असलेल्या प्रेमसंबंधासाठी एका तरुणीला मृत्यूची शिक्षा भोगावी लागलेली आहे. पत्नीने आपल्या भावाच्या मदतीने नवऱ्याच्या मैत्रिणीचा जीव घेतलेला असून आपल्या पतीचे अनैतिक संबंध समजल्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , पतीच्या अनैतिक संबंधाबद्दल पत्नीला माहिती मिळालेली होती. अनेकदा सांगून देखील पतीच्या वागण्यात काही बदल होत नव्हता त्यानंतर तिने त्याच्या प्रेयसीला देखील समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तिच्यात देखील काही बदल झाला नाही म्हणून संतप्त झालेल्या या पत्नीने भावाच्या मदतीने पतीच्या प्रेयसीवरच गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर तिचा मृतदेह पुलावरून खाली फेकून दिला. रागिनी असे मयत महिलेचे नाव असल्याचे समजते.

बंटी असे आरोपी महिलेच्या पतीचे नाव असून त्याच्या पत्नीचे नाव राखी असे होते. गाजियाबाद येथील ही घटना असून 21 वर्षीय रागिणीचे गेल्या काही वर्षांपासून बंटीसोबत प्रेम संबंध जोडलेले होते. बंटीची पत्नी राखी हिला याचा अनेक वेळा राग यायचा . तिने पतीला देखील समजावून सांगितले त्यानंतर प्रेयसीला देखील समजावून सांगितले मात्र दोघांच्याही वागण्यात काही बदल दिसत नसल्याने अखेर तिने भावाला मदतीला घेऊन तिची हत्या केलेली आहे.

राखीच्या भावाने रागिनी हिला आधी भेटायला बोलावले आणि त्यानंतर हिंडन नदीच्या काठावर तिच्यावर गोळ्या झाडल्या. ती मयत झाल्याचे लक्षात येताच राखी आणि तिच्या भावाने तिचा मृतदेह पुलावरून खाली फेकून दिला. धक्कादायक बाब म्हणजे पतीला ही बाब समजल्यानंतर देखील तो पोलिसात गेला नाही उलट त्याने या दोघांना पुरावे नष्ट करण्यास मदत केली. रागिनी ही तिच्या प्रियकराला ब्लॅकमेल करत होती का? याचा देखील पोलिस आता शोध घेत आहे.


Spread the love