‘ माझ्या मिठूला आणून द्या ‘ , शहरभर लावले पोस्टर अन त्यानंतर..

Spread the love

भारतामध्ये पोपट पाळणे बेकायदेशीर असून जे पक्षी भारतीय वातावरणात राहू शकतात त्या पक्षांना कैद करून ठेवण्यास बंदी आहे मात्र मध्यप्रदेशातील दमोह शहरात एका व्यक्तीने पोपट पाळलेला होता आणि अचानकपणे तो तोडून गेला त्यामुळे व्यथित झालेल्या व्यक्तीने शहरभर दवंडी पेटवत ‘ माझ्या मिठूला जो कोणी आणून देईल त्याला मी दहा हजार रुपयांचे बक्षीस देईन ‘ असे सांगत त्याने रिक्षात माईक लावून शहरभर जाहिरात सुरू केलेली आहे तर या पोपटाचे पोस्टर देखील शहरात चिटकवण्यात आलेले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार , दीपक सोनी ( राहणार इंदिरा कॉलनी ) असे पोपटाच्या मालकाचे नाव असून घरातील सदस्याप्रमाणे त्याने दोन वर्षांपासून पोपट पाळलेला होता. त्याच्या घरातील पोपट सर्वांचा लाडका होता. मंगळवारी देखील वडिलांच्या खांद्यावर बसून पोपट फिरायला गेला मात्र कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला आणि तो उडून गेला. मागील आठवड्यापूर्वी देखील तो उडून गेलेला होता मात्र तो पुन्हा आला.

वडिलांसोबत फिरण्यासाठी म्हणून गेलेला पोपट पुन्हा आलाच नाही म्हणून दीपक हे व्यथित झाले आणि त्यांनी त्याचा शोध घेण्यासाठी चक्क शहरात दवंडी पिटवण्यास सुरुवात केली. संपूर्ण कुटुंबात सध्या चिंतेचे वातावरण असून रिक्षाला या पोपटाचा फोटो लावून जाहिरात केली जात आहे तर काही पोस्टर देखील शहरात चिटकवण्यात आलेले आहेत.


Spread the love