
महाराष्ट्रात पती-पत्नीचा वाद मिटवताना वादावादी सुरू झाली आणि त्यातून मेव्हणा आणि सासऱ्याने जावयाला जोरदार मारहाण केली याप्रकरणी आठ जणांच्या विरोधात सागर भिकाजी जोशी ( वय 26 राहणार शाहुनगर जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर ) या जावयाने कुरुंदवाड पोलिसात तक्रार दिली आहे.
सदर प्रकरणी सासरा सुधाकर माने, मेहुणा अक्षय सुधाकर माने, प्रशांत चव्हाण, गौतम एडके यांच्यासह अनोळखी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , गोठणपूर गल्लीतील सुधाकर माने यांची मुलगी श्वेता हिच्यासोबत सागर जोशी यांचा विवाह झाला होता. गेल्या आठ महिन्यांपासून ती माहेरी कुरुंदवाड येथे राहत होती. प्रशांत चव्हाण याच्या मध्यस्थीने पती-पत्नीचा वाद मिटवण्यासाठी कुरुंदवाड येथे रविवारी दुपारी बैठक सुरू होती त्यावेळी सागर जोशी याला अक्षय माने, सुधाकर माने या दोघांनी आम्ही न्यायालयात पोटगी दावा दाखल करणार आहोत अशी दमदाटी करत त्याला बेदम मारहाण केली. सागर याचा मोबाईल या मारहाणीत फुटलेला असून सदर प्रकरणाचा कुरुंदवाड पोलीस तपास करत आहेत.