‘ माय बेबी माय बोंबा ‘ , जॅकलीन फर्नांडिसला लिहलंय प्रेमपत्र

Spread the love

तब्बल 200 कोटी रुपये मनी लॉण्डरिंगच्या आरोपाखाली दिल्लीतील मंडोली तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर याने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिला पुन्हा एकदा प्रेमपत्र पाठवलेले असून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वतःच्या हाताने त्याने जेलमध्ये तिच्यासाठी ग्रीटिंग बनवलेले असून ते तिला पाठवून दिलेले आहे.

सुकेश याचे वकील अनंत मलिक यांनी जॅकलीन फर्नांडिस हिचा 11 ऑगस्ट रोजी वाढदिवस होता त्यावेळी हे पत्र जाहीर केलेले असून त्यामध्ये त्याने सुकेश याने जॅकलीन हिचा ‘ माय बेबी माय बोंबा ‘ असा उल्लेख केलेला आहे सोबतच तुला वाढदिवसासाठी शुभेच्छा हा माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस आहे. माझ्या स्वतःच्या वाढदिवसापेक्षा देखील हा दिवस महत्त्वाचा असून प्रत्येक दिवसातगणिक तू आणखीन तरुण आणि सुंदर होत आहेस. तुला कल्पना नाही मला तुझी किती आठवण येत आहे. पुढील वाढदिवस आपण सोबत साजरा करू आणि तो खूप खास असेल , ‘ असे देखील त्याने या पत्रात म्हटलेले आहे.


Spread the love