मुंबईतील महिलेचा लखनौमधील दीर ‘ त्या ‘आशेने मुंबईत आला अन ..

Spread the love

दीर आणि वहिनीचं नात हे भावा-बहिणीप्रमाणे असतं मात्र अनेकदा या नात्याला काळीमा फासल्याच्या देखील घटना समोर आलेल्या आहेत . अशीच एक घटना उघडकीस मुंबई इथे उघडकीस आली असून लखनऊमधील एका दिराने वहिनीचा आंघोळ करीत असतानाचा व्हिडीओ शूट केला आणि तिला ब्लॅकमेल करणे सुरु केले. हा व्हिडीओ हातात आल्यावर त्याने आपल्याच वहिनीचे लैंगिक शोषण सुरु केले. त्याचा त्रास असह्य होऊ लागल्याने पीडित महिलेने पतीसोबत पोलीस ठाण्यात धाव घेतली.

उपलब्ध माहितीनुसार, मुंबई येथील ही महिला असून एकेदिवशी ती बाथरूममध्ये आंघोळ करीत होती. त्यादरम्यान तिच्या लखनऊ येथून आलेल्या तिच्या दिराने तिचा व्हिडीओ शूट केला. व्हिडीओ शूट केल्यानंतर त्याने वहिणीवर लैंगिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकला तसेच हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही. दिराचं कृत्य पाहून महिलेने सर्व घटनेबाबत पतीला माहिती दिली. भावाने केलेलं कृत्य पाहून महिलेच्या पतीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

30 सप्टेंबर रोजी महिलेने मुंबईतील वनराई पोलीस ठाण्यात दिराविरोधात गुन्हा दाखल केला होता यानंतर प्रकरण लखनऊला ट्रान्सफर होऊन येथील पोलिसांनी शनिवारी त्याला अटक केली आहे . अशाच स्वरूपाच्या घटना पूर्वी देखील उघडकीस आलेल्या असून महिलांनी येत्या काळात जास्त काळजी घेणे गरजेचे झालेले आहे.


Spread the love