मुंबई हादरली..महिला डॉक्टरच्या केबिनमधील ‘ नको तो ‘ प्रकार महिलेच्या नातेवाईकांपर्यंत

Spread the love

महाराष्ट्रात आजकाल पैसे कमावण्यासाठी कोण काय करेल याचा भरवसा राहिलेला नाही अशीच एक धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली असून चक्क एका कम्पाऊण्डर महिलेने आपल्या प्रियकराला सोबत घेऊन हा धक्कादायक प्रकार केल्याचे समोर आले आहे. एक महिला डॉक्टर आणि तिच्या मित्राचा अश्लील व्हिडीओ शूट करत कंपाउंडर महिलेच्या प्रियकराने ब्लॅकमेल करत डॉक्टरकडे पैशाची मागणी केली होती नाहीतर व्हिडीओ व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी कम्पाऊण्डरने डॉक्टरला दिली होती.

उपलब्ध माहितीनुसार , तक्रारदार डॉक्टर महिलेचे मुंबईतील शाहू नगर परिसरात क्लिनिक आहे. आरोपी महिलेचे नाव ताहिरा खान असे असून ती क्लिनिकमध्ये कम्पाउण्डर म्हणून काम करत होती मात्र दरम्यानच्या काळात तिला या महिला डॉक्टरच्या प्रेमप्रकरणाची माहिती झाली आणि तिने चोरून त्यांचा सदर महिला डॉक्टरच्या केबीनमधील व्हिडीओ शूट केला. क्लिप हाती आल्यावर तिने हा व्हिडीओ तिचा प्रियकर समशेर चौधरी याला दिला.

समशेर याने सदर अश्लील व्हिडीओच्या आधारे डॉक्टर महिलेशी संपर्क साधला त्यानंतर त्याने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. हळूहळू कंपाउंडर महिलेच्या मदतीने त्याने डॉक्टर महिलेच्या नातेवाईकांचे फोन नंबर मिळवले आणि त्यांना देखील तिचा अश्लिल व्हिडीओ पाठवला. पाच लाख रुपये दिले नाहीत, तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी या महिला डॉक्टरला त्याने दिली.

सतत त्याचा हा त्रास होत नसल्याने महिला डॉक्टरने जे होईल ते होईल आधी हिंमत दाखवत धारावी पोलीस ठाण्यात धाव घेतली.युनिट-5 चे प्रभारी घनशाम नायर यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल माळी, जयदीप जाधव तसेच इक्बाल सिंग, तानाजी पाटील, हरेश कांबळे या पथकाने तपास सुरु केला आणि महिला डॉक्टरच्या माध्यमातून धारावी पोलिसांनी समशेरला पाच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली मात्र तो आलाच नाही मात्र त्याला घाटकोपरमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांनी झडप घालून त्याला आधी बेड्या ठोकल्या तर त्याच्या प्रेयसीला देखील त्यानंतर अटक करण्यात आली.


Spread the love