‘ मॅडम तुमच्या पोटावरचा टॅटू मला खूप आवडला ‘ , पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा चक्क ..

Spread the love

एक खळबळजनक घटना महाराष्ट्रात समोर आली असून स्वतःच्याच पत्नीचे नग्न फोटो तिच्या फोन नंबर सहीत सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या एका पतीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई येथील ही घटना असून महिलेचा पती हा बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर महिला ही अठ्ठावीस वर्षांची असून येथील एका खाजगी कंपनीत काम करते. तिला पाच जुलै रोजी एक फोन कॉल आला होता त्यामध्ये ‘ तुमचं शरीर खूपच सुंदर आहे. मी तुमच्या पोटावरचा टॅटू पाहिला आहे, तो मला खूप आवडला ‘ असं समोरची व्यक्ती म्हणत होती त्यावेळी महिलेने तुम्हाला माझा नंबर कुठून मिळाला असे विचारले असता एका ऐप वरून तुमचा नंबर मला मिळालेला आहे असे सांगितले. माझ्या पत्नीला पाहण्यात आणि तिच्याशी हॉट बोलायला तुम्हाला आवडेल का ? तुम्हाला जर आवडत असेल तर मला मेसेज करा असे देखील लिहिलेले त्याने सांगितल्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली.

महिलेने तक्रार दाखल करतेवेळी आपण आणि आपला पती गेल्या काही वर्षांपासून वेगळे राहत असून पती हा पाटणा येथे राहायला आहे तर मी मुंबईत काम करते. मी मागणी मागील वर्षी पतीच्या विरोधात मानसिक छळाची तक्रार दाखल केली होती. ती तक्रार मागे घ्यावी म्हणून पती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यावर दबाव टाकतो. तक्रार मागे न घेतल्यास झालेल्या होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा असे देखील धमकावतो असे महिलेने म्हटले आहे. महिलेचे नग्न फोटो कुठून अपलोड करण्यात आले याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.


Spread the love