मेहुणीच्या प्रेमात सगळ्या मर्यादा पार , बायकोची अडचण नको म्हणून बनाव केला अन..

Spread the love

एक धक्कादायक असे प्रकरण बिहारच्या पाटणा इथे समोर आलेले असून मेहुणीच्या प्रेमात वेड्या झालेल्या वेडा झालेल्या एका पतीने पत्नीची हत्या केलेली आहे. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील चकमरिया रोड अझमनगर पोलीस स्टेशन परिसरातील ही घटना असून आरोपी पतीने पत्नीला आधी पाण्यात बुडवले आणि त्यानंतर तिच्यावर तेरा वार करत तिचा जीव घेतलेला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने तिच्या माहेरी अज्ञात तीन व्यक्तींनी हा प्रकार केला असे म्हटलेले होते मात्र पोलिसांच्या तपासात त्याचा हा बनाव समोर आलेला आहे.

आरोपीच्या पत्नीला लग्नानंतर मूल होत नव्हते त्यामुळे त्याने सर्व काही उपचार करून पाहिले मात्र तरीदेखील तिला मूल होत नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने मेहुणीसोबत लग्न करण्याचा प्लॅन केलेला होता. मेहुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात त्याने अडकवले आणि त्यानंतर पत्नी त्याला अडथळा ठरत होती म्हणून त्याने पत्नीचा खून केला. आश्रफी खातून असे मयत महिलेचे नाव आहे.

अश्रफी हिचा भाऊ मोहम्मद अख्तर यांनी यासंदर्भात पोलिसात फिर्याद दिलेल्या असून फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे त्याची बहीण पतीसोबत बाजारात गेलेली होती. घरी परत येत असताना पाऊस सुरू झाल्यावर तिने आई-वडिलांना फोन करून आपण पतीसोबत घरी येत आहोत असे सांगितले. त्याच्या आईचे घर बाजारापासून जवळ होते म्हणून त्याच्या बहिणीने तिथे येण्याचे सांगितले. थोड्या वेळात त्याच्या मेहुण्याने फोन केला की घरी येत असताना तीन मुखवटा घातलेल्या गुन्हेगारांनी अडवले आणि विरोध केला असता बहिणीवर चाकू हल्ला केला त्यात ती जखमी झालेली आहे.

अश्रफी खातून यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ घटनास्थळ गाठले त्यावेळी तिचा मृत्यू झालेला होता. गुन्हेगारांच्या हल्ल्यामुळे तिचा मृत्यू झाला याच्यावर कुटुंबियांचा विश्वास बसला नाही. हल्ल्याच्या वेळी तिच्यासोबत तिचा पती देखील होता मात्र त्याला साधा एक ओरखडा देखील आला नाही त्यानंतर त्याच्यावर संशय व्यक्त करत तक्रार देण्यात आलेली असून पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिलेली आहे.


Spread the love