मैत्रीवर विश्वास ठेवला , मुलीच्या राहत्या परिसरात फोटो झाले व्हायरल

Spread the love

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समोर आलेला असून मैत्रीवर विश्वास ठेवून एका सतरा वर्षाच्या मुलीने तिच्या मित्राला स्वतःचे ‘ नको ते ‘ फोटो पाठवले मात्र त्यानंतर त्याने वाद झाल्यानंतर तिची बदनामी करण्याच्या उद्देशाने तिचे फोटो आणखीन दोन मित्रांना पाठवले आणि त्यानंतर हे फोटो व्हायरल झाले . पीडित मुलीला हा प्रकार कळाल्यानंतर वेदांतनगर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अनिकेत राठोड ( राहणार प्लॅटिनम सिटी शेंद्रा ), कुणाल बाबत ( राहणार छोटा मुरलीधर नगर ) आणि उमेद पाशा ( राहणार क्रांतीनगर ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे असून मुख्य आरोपी असलेल्या व्यक्तीने या मुलीसोबत मैत्री केलेली होती आणि त्यातून त्याने या मुलीचे काही नको त्या अवस्थेतील फोटो मागवलेले होते मात्र त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्याने हे फोटो व्हायरल केले.

15 ऑगस्ट रोजी सदर बाब मुलीच्या लक्षात आल्यानंतर तिने तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली आणि त्यानंतर आई-वडिलांसोबत पोलीस ठाण्यात दाखल होत पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्याकडे तक्रार दिली . गिरी यांनी तात्काळ तीनही जणांचा शोध घेत त्यांना अटक करून न्यायालयात हजर केलेले असून न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलेली आहे.


Spread the love