
कोरोनाच्या काळात संथ पडलेला वेशाव्यवसाय पुन्हा एकदा डोके वर काढत असून पुणे शहरानजीक पिंपरी येथे अशीच एक घटना समोर आलेली आहे. स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याने पोलिसांना या प्रकाराची खबर मिळाली आणि पोलिसांनी कारवाई करत चार पीडित महिलांची सुटका करत सोळा हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पिंपळे सौदागर येथे गुरुवारी संध्याकाळी ही कारवाई केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, स्पा सेंटरचा मॅनेजर निवृत्ती प्रकाश पाटील ( वय 25 राहणार वाकड मूळ राहणार जिल्हा जळगाव ) आणि स्पा सेंटरचा मालक विजय गंगाराम देशमुख ( वय 33 राहणार वाकड मूळ राहणार जिल्हा धुळे ) अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. सदर प्रकरणी एका 28 वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळे सौदागर येथील शिवार चौक येथे ‘ द योग अँड स्किन केअर ‘ या सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आणि पीडित महिलांची यातून सुटका करण्यात आली.