राहवलं नाही ..’ त्या ‘ अल्पवयीन प्रेमीयुगुलाने जे केला ते पाहून ..

Spread the love

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना घडत असताना अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यात कामठी येथे उघडकीला आली असून मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर त्यांना लग्न करण्याची इच्छा होती मात्र दोघेही अल्पवयीन असल्या कारणाने कुटुंबीयांनी त्याला विरोध दर्शवला होता त्यामुळे निराश होऊन एका प्रेमीयुगुलाने शनिवारी रात्री कामठी शहरानजीक हावडा-अहमदाबाद एक्सप्रेससमोर एकमेकांचे हात घट्ट धरून जीवनयात्रा संपवली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आदित्य लक्ष्मीनारायण कुरील ( वय 18 ) आणि सायली गौतम नगराळे ( वय सोळा ) अशी मयत व्यक्तींची नावे असून दोघेही कामठी शहरातील रहिवासी असून गुरुवारी कुणालाही काहीही न सांगता ते घराबाहेर पडले होते. आदित्य याच्याकडे त्याची मोटरसायकल होती मात्र दोघेही घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेत अखेर ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.

एकीकडे पोलीस तपास करत असताना आदित्य आणि सायली शुक्रवारी रात्री बाळापूर परिसरात असल्याची माहिती हाती लागली आणि त्यानंतर एक तासाने दोघांचेही मृतदेह रेल्वे रुळावर पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता दोघांनीही एकमेकांचे हात घट्ट धरून एक्सप्रेस समोर उडी मारुन आत्महत्या केल्याचे समोर आले.

त्यांच्या विवाहाला घरातून विरोध हा दोघेही अल्पवयीन असल्याने होता त्यामुळे ते निराश झाले होते आणि त्यातूनच त्यांनी रेल्वेच्या समोर उडी मारून आत्महत्या केली. सदर घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस तपास सुरू असल्याचे समजते.


Spread the love