
महाराष्ट्रात ग्रामीण भागात अनेक तरुणांना लग्नासाठी वधू मिळत नसल्याचे चित्र आहे त्यामुळे अनेक तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे अशीच एक घटना कोल्हापूर जिल्ह्यात पेठ वडगाव येथे समोर आले असून एका सलून चालकाने लग्न होतच नसेल तर जगायचे कशासाठी आणि कुणासाठी ? असा विचार करून आत्महत्या केली आहे. रविवारी सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीला आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, विजय वसंत शिंगे ( वय 28 ) असे या तरुणाचे नाव आहे. तो त्याच्या आई आणि भावासह राहत होता. गावातील मुख्य रस्त्यावर त्याचा सलूनचा व्यवसाय होता. शनिवारी रात्री झोपण्यासाठी तो घरातील खोलीत गेला मात्र सकाळी बराच वेळ न उठल्याने त्याच्या खोलीचे दार उघडून बघितले असता त्याने गळफास घेतल्याचे समोर आले. सदर प्रकरणी कुटुंबीयांनी पेठ वडगाव पोलिस ठाण्यात माहिती दिली.