
महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे लग्नाच्या आदल्या दिवशीच वधूचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संजना श्रीनिवास वेर्णेकर ( वय 27 राहणार संकेश्वर रोड गडहिंग्लज ) असे मयत वधूचे नाव आहे. दहा तारखेला सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीला आली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजना हिचा शुक्रवारी हुबळी येथे विवाह होणार होता त्यामुळे वेर्णेकर यांच्या घरी धावपळ सुरू होती. संपूर्ण घरात मंगलमय वातावरण असताना गुरुवारी सकाळी संजना ही पाणी आणण्यासाठी गेली आणि पाण्याच्या टाकीत पडली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर ती अखेर पाण्याच्या टाकीत पडल्याचे दिसताच नातलगांनी हंबरडा फोडला.
तिला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. लग्नाच्या एक दिवस आधीच काळाने तिच्यावर घात केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विश्वनाथ रायकर यांनी यासंदर्भात गडहिंग्लज पोलिस ठाण्यात खबर दिली असून घटनेची नोंद करण्यात आलेली आहे.