लग्न होताच मंगल कार्यालयातच होणार होता ‘ धक्कादायक ‘ प्रकार मात्र ..

Spread the love

नागरिक कितीही शिकले तरी परंपरागत रुढींचे पालन करताना अनेकदा त्यांच्याकडून मानवतेची पातळी देखील ओलांडली जाते असेच एक प्रकरण कोल्हापूर येथे उघडकीस आले असून शिरोली परिसरात एका विवाह समारंभानंतर चक्क मंगल कार्यालयातच नववधूची कौमार्य चाचणी घेण्याचा घाट रचण्यात आला होता मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हस्तक्षेपाने हा प्रकार थांबवण्यात यश आलेले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी हॉल मालक, वधू-वर आणि त्यांच्या पालकांना नोटीस पाठवून यांचा जबाब घेतला असता असा कोणताही प्रकार करणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णात स्वाती यांनी म्हटले आहे की, शिरोली परिसरातील एका हॉलमध्ये गुरुवारी एका समाजातील विवाह समारंभ होणार होता आणि विवाह झाल्यानंतर तिथेच नववधूची कौमार्य चाचणी घेऊन त्यानुसार निर्णय घेण्यात येणार असल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे करण्यात आली होती.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीले शिरोली एमआयडीसी येथील पोलिस उपनिरीक्षकांना असा प्रकार रोखण्यात येण्याची मागणी केली त्यानंतर पोलिसांनी हॉल मालक वधू वर आणि त्यांच्या पालकांना नोटीस काढून जबाब घेतला असताना अशी कोणतीही चाचणी आम्ही करणार नाही, असे त्यांनी जबाबात सांगितले आहे.


Spread the love